चित्रपटातील भूमिका खऱ्याखुऱ्या वाटण्यासाठी अनेक स्टार संबंधित व्यक्तीरेखा कशा जगल्या याचा अनुभव घेतात. बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत जे स्वत:च्या भूमिका जिवंत करण्यासाठी अशी मेहनत घेतात. अशीच एक भूमिका करण्यासाठी अभिनेत्री शोभिता धूलिपा मुंबईच्या रेड लाईट एरियामध्ये पोहोचली.
नवाजुद्दीन सिद्दकीसोबत ‘रमन राघव 2.0’ चित्रपटात दिसलेली शोभिता ‘मूतोन’ या सिनेमात महत्त्वाचा रोल साकारत आहे. या सिनेमात शोभिता मुंबईतल्या कमाठीपुरीमधील एका बिंधास्त महिलेची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी शोभिता काही काळ रेड लाईट एरियामध्ये राहिली होती. हा अनुभव तिने शेअर केला आहे. जगभरात लोकांची ओळख त्यांच्या रंगावरून आणि धर्मावरून केली जाते. पण, कामठीपुरीमध्ये असे चित्र नाही. ते लोक खूप वाईट परिस्थितीत जगतात. पण तरीही ते प्रेमळ आहेत. गीतू मोहनदास या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. या सिनेमासाठी अनुराग कश्यप यांनी संवाद लिहिले आहेत. हा सिनेमा 2018 मध्ये रिलीज होणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews